नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुःखद बातमी | मिरज तालुक्यातील भाजप उमेदवाराच्या पतीचे हृदयविकाराने निधन; म्हैसाळ पंचायत समिती गणात शोककळा

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – राजेंद्र पवार

मिरज:- दि. ०१/०२/२०२६
मिरज तालुक्यातील म्हैसाळ पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कविता गणेश निकम यांचे पती तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश अशोक निकम (वय ४६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.
गणेश निकम हे गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने योगदान दिले होते. त्यांच्या निष्ठावंत आणि कार्यक्षम पक्षकार्याची दखल घेत पक्षाने मिरज पंचायत समिती अंतर्गत म्हैसाळ गणासाठी त्यांच्या पत्नी कविता निकम यांना अधिकृत उमेदवारी दिली होती.
निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना गणेश निकम यांनी प्रचाराचे नियोजन करत गावागावात संपर्क साधून जोमाने प्रचार सुरू केला होता. मात्र, रविवारी (ता. १) अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तत्काळ त्यांना उपचारासाठी मिरज येथील युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या आकस्मिक निधनामुळे म्हैसाळ परिसरात शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत निकम कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय व मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!