नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

१ हजाराची लाच घेताना कोगींल बुद्रुकचा कोतवाल रंगेहात अटक.कोल्हापुर एसीबीची कारवाई

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन देसाई

इचलकरंजी:- जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी १,००० रुपयांची लाच मागणाऱ्या करवीर तालुक्यातील कोगींल बुद्रुक येथील कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. विनोद कृष्णात बामणकर (वय २९ वर्षे) यालाअटक करण्यात आलेली आहे. यातील तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे कोगींल बुद्रुक येथे गट नं. ५३१ मध्ये शेतजमीन आहे. जमिनीवर एका सहकारी संस्थेचा बोजा नोंदवण्यात आला होता. बोजा कमी करण्यासाठी तक्रारदार महसूल विभागाच्या कार्यालयात गेले असता, कोतवाल विनोद बामणकर याने ७/१२ वरील बोजा कमी करून देण्यासाठी १,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली. पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सापळा रचला सापळा कारवाईत पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून १,००० रुपये स्विकारताना विनोद बामणकर याला रंगेहात पकडण्यात आले. विनोद धामणकर याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!