नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात घरफोड्यांचा धुमाकूळ संपला! सराईत आरोपी गजाआड, 14 घरफोड्यांचा पर्दाफाश; 44.68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून नागरिकांच्या घरातील सोन्या-चांदीवर डल्ला मारणाऱ्या सराईत घरफोड्या आरोपी प्रताप सुरेश कदम (वय 31 रा. सध्या, शिक्षक कॉलनी, पाचगाव, कोल्हापूर) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) कोल्हापूर यांच्या पथकाने अटक करत मोठा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत आरोपीकडून करवीर पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल 14 घरफोड्या उघडकीस आणण्यात आल्या असून पोलिसांनी 230.190 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 किलो चांदी व इतर साहित्य असा एकूण 44,68,050/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र एलसीबीच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.
ही संपूर्ण कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधिक्षक बी. धिरजकुमार उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सूर्यवंशी यांनी करण्यात आली. आरोपी अटकेत आल्यामुळे घरफोडीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
पोलिसांनी आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरु केला असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:35 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!