नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आरग रेल्वे स्टेशन परिसरात २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला; रेल्वे अपघाताची शक्यता — शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होणार

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : राजेंद्र पवार

मिरज:- आरग रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मृत तरुणाची ओळख महेश श्रीमंगले (वय २५, रा. लातूर) अशी पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार रेल्वे अपघाताचा असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळी पाहणी करताना रेल्वे मार्गालगत मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तत्काळ यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील करण्यात येत आहे.
मृत तरुण आरग परिसरात कशासाठी आला होता, तो एकटाच होता का, तसेच अपघात नेमका कसा घडला याचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित घटनेची नोंद करून लोहमार्ग पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:25 am, September 21, 2026
27°C
साफ आकाश
72 %
4 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!