नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळीत महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिराचे भूमिपूजन व तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री :- दि.१५ फेब्रुवारी रविवारी रोजी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला शेवाळी (दा) ता.साक्री येथे ग्राम सुधार मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भद्रावती नदीकाठी असलेल्या मारुती मंदिराच्या शेजारी असलेल्या जमिनीवर महादेव मंदिराचे सकाळी नऊ वाजेपासून अभिषेक, महापूजा करून भूमिपूजन करण्यात आले. ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव लक्ष्मण साळुंके व गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मंगलाताई भदाणे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी सरपंच उपसरपंच, विवि शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

शेवाळी गावातील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे महाशिवरात्री निमित्त शिवरात्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात शिव ध्वजारोहण, शिव प्रतिज्ञा, प्रसाद वाटप यांचा समावेश होता.
महाशिवरात्री हा देशातील एक अत्यंत पवित्र अध्यात्मिक महत्त्व असलेला सण असून या दिवशी संपूर्ण देशात भक्ती भावात शिव पूजन केले जाते. या दिनाचे औचित्य साधून ब्रह्मकुमारीज संस्थेच्या वतीने शिवज्ञान जागृती, अध्यात्मिक संदेश, प्रसाद ध्यान साधना, उपवासाचा वास्तविक अर्थ, शिव आणि शंकर यातील अंतर समजाविण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व ज्ञान चिंतनिका ब्रह्मकुमारीस कविता दीदी यांनी केले होते.कार्यक्रमाच्या शेवटी संदेश पत्रिका व प्रसाद वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मंगलताई भदाणे, यादवराव साळुंके, सुरेश साळुंके, धनाजी साळुंके, गबाजी साळुंके व तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:23 am, September 21, 2026
27°C
साफ आकाश
72 %
4 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!