नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्नीचा खून करून फरार पतीला ८ तासांत अटक!

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या ८ तासांत आरोपी गणेश शंकर हुबळे (वय ४० रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ कोल्हापूर ) पतीला अटक करून खुनाचा छडा लावला आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल्हापुरातील एका परिसरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पती फरार झाला. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गुन्हा दाखल होताच पोलिसांचा शोध सुरू
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी तपासाला वेग दिला.
गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती मिळवत पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सापडला
पोलिसांना आरोपी एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाली करत सापळा रचून आरोपी पतीला ताब्यात घेतले.
८ तासांत खुनाचा छडा
घटनेनंतर अवघ्या ८ तासांत आरोपीला अटक करून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून चौकशीत खून केल्याची कबुली दिल्याचे समजते.
पोलिसांचे कौतुक
या जलद कारवाईमुळे कोल्हापूर पोलिसांची तत्परता आणि कार्यक्षमता अधोरेखित झाली असून, नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!