नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरज शहर पोलिसांची १२ तासांत जबरी चोरी उघड — दोन सराईत आरोपी अटकेत

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार

मिरज:- ता. १८ फेब्रुवारी २०२६ मिरज शहर पोलीस ठाण्याने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांच्या आत उघड करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून रेकॉर्डवरील सराईत आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ब्राम्हणपुरी परिसरातील राहत्या घरी एकट्या असलेल्या ७५ वर्षीय महिलेच्या घरी दोन अनोळखी इसम पंचांग पाहण्याच्या बहाण्याने आले. घरात प्रवेश केल्यानंतर एका आरोपीने महिलेचे तोंड दाबून धरले तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने तोडून पळ काढला. या प्रकरणी रात्री ९.४६ वाजता गुन्हा क्रमांक ६९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी तत्काळ वेगवेगळी तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशय लिंगनूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार लक्ष्मण श्रीकांत नाईक याच्यावर गेला. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला आणि त्याचा साथीदार राहुल दगडू बनसोडे (वय २२) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची निळ्या रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार जप्त करण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या सुमारे २.२५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या गंठणाच्या जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर सहभागी साथीदारांचा शोध सुरू आहे.
मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्र्य पुजारी करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:28 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
2 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!