DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधि : संजय दिंडे
कोल्हापूर :- कोल्हापूर शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत घरफोड्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे करवीर पोलीस ठाण्यांतर्गत असलेले तब्बल १४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून ४४ लाख ६८ हजार ०५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम चोरीचे दागिने विकण्यासाठी उजळाईवाडी परिसरात येणार आहे. त्यानुसार २७ जानेवारी २०२६ रोजी भारती विद्यापीठ परिसरातील हायवे रोडवर सापळा लावून प्रताप सुरेश कदम (वय ३१, रा. पाचगाव, मूळ रा. शिरोली एम.आय.डी.सी.) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी पायी फिरून बंद घरे लक्ष्य तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी प्रताप कदम हा कोणताही कामधंदा करत नव्हता. तो गेल्या तीन वर्षांपासून पाचगाव परिसरात भाड्याने राहत होता. रात्रीच्या वेळी पायी चालत जाऊन तो उपनगरातील बंद असलेली घरे हेरायचा आणि तिथे घरफोडी करायचा. गेल्या दोन वर्षांपासून त्याने अशा अनेक घटनांना अंजाम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींचे कडुन
सोने: २३०.१९० ग्रॅम
चांदी: ३ किलो अशी एकूण किंमत ४४,६८,०५० रुपये ची मालमत्ता जप्त करण्यात आले. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ, फौजदार शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी यांनी केली.



