नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अनैतिक व्यापार करणाऱ्या महिलेवर प्रथमच ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधि : संजय दिंडे

कोल्हापूर :- मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. अनैतिक व्यापार करणाऱ्या एका महिला आरोपीविरुद्ध एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई करणारा कोल्हापूर जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथमच कोल्हापूर शहर, करवीर आणि पन्हाळा परिसरात अनैतिक मानवी व्यापार आणि संघटित गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता धोक्यात आली होती. यामध्ये श्रीमती फातिमा उर्फ मुस्कान विजय देसाई (वय ३३, रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड, कोल्हापूर) ही महिला सक्रिय असल्याचे समोर आले होते. तिच्याविरुद्ध असलेल्या गंभीर गुन्हेगारी अभिलेखाच्या आधारे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने तिच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता.प्रशासकीय मंजुरी आणि अंमलबजावणी प्रस्ताव
जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर पडताळणीअंती १० फेब्रुवारी २०२६ रोजी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार, संबंधित महिलेला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. २०२५ च्या दुरुस्तीनुसार आता मानवी अपव्यापार आणि बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या व्यक्तींवरही एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे शक्य झाले आहे.
राज्यातील पहिली कारवाई: पीटा (PITA) कायद्यानुसार अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई कोल्हापूर पोलिसांनी राज्यात प्रथमच केली आहे.
कारवाई पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली. समाजातील महिलांची सुरक्षितता आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!