नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – गौतम दिवान

हातकणंगले:- अतिग्रे: जे.ई.ई. मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत याने ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले.संस्थेच्या सहिम पटवेगार (९९.८१) उपेंद्र तेलसंग (९९.८०) विवेक तोडकरी (९९.७९) अथर्व निर्वाणे (९९.७८), तनय दागा (९९.७६) पर्सेटाईल गुण मिळवून विद्यार्थ्यानी उल्लेखनीय कामगिरी केली . सहिम पटवेगार या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेटाईल गुण मिळाले.
संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईल च्या वरती गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक वासू सर यांनी अभिनंदन केले आहे. या प्रसंगी ते म्हणाले की सातत्य म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहे. योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:26 am, September 21, 2026
27°C
साफ आकाश
72 %
4 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!