नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुपवाडमध्ये पाच गायींची सुटका; अमानुष वाहतूकप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार

मिरज :- कुपवाड, दि. 24 फेब्रुवारी 2026 : कुपवाड परिसरात जनावरांची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईदरम्यान पाच देशी गायींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई कुपवाड औद्योगिक पोलिसांनी केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी श्यामनगर परिसरात संशयास्पदरीत्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवले. तपासणीदरम्यान आरोपींनी पाच देशी गायी वाहनात अत्यंत कोंडून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्या. जनावरांना हवा, चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले. तसेच दोऱ्यांनी घट्ट बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
या प्रकरणी चल्लाप्पा जलवाडे, विठ्ठल कांबळे, गोपाल मराठे, विजयकुमार जलवाडे व सुनील जलवाडे (सर्व रा. श्यामनगर, कुपवाड) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने होत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याबाबत सखोल तपास सुरू आहे.
कारवाईदरम्यान पाचही गायींची सुरक्षित सुटका करून त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी आनंददादा घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड औद्योगिक पोलीस करत आहेत.
या कारवाईमुळे जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:27 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
2 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!