नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बॅकिंग क्षेत्रात राष्ट्रीय यश;निजामपुरच्या अक्सा बेग मिर्झा यांची परिविक्षाधीन अधिकारी पदावर निवड

DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री : निजामपूर (ता. साक्री) येथील कु. अक्सा बेग आसिफ बेग मिर्झा हिने बँकिंग क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer) पदावर निवड मिळवली आहे. बँक कर्मचारी निवड संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ग्रामीण बँक भरती प्रक्रियेत तिने मुख्य लेखी परीक्षा व मुलाखत या दोन्ही टप्प्यांत यश मिळवत अंतिम निवड निश्चित केली.
ही परीक्षा देशातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. गणितीय क्षमता, तर्कशक्ती, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बँकिंग विषयांवरील सखोल अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि वेळेचे नियोजन या बळावर अक्साने हे यश संपादन केले. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करून मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
सामाजिक वारशाची प्रेरणा
अक्सा या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे माजी धुळे जिल्हाध्यक्ष व समाजसेवक स्वर्गीय आसिफ बेग मिर्झा यांच्या मोठ्या कन्या आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे, शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना योग्य मार्गदर्शन करणे या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. वडिलांकडून लाभलेले शिस्तबद्धता, नेतृत्वगुण आणि लोकसेवेचे संस्कार अक्साच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने दिसून येतात.
कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण
अक्सा या निजामपूर येथील मिलन सोडा सेंटरचे मालक हाजी मियाबेग मिर्झा यांची नात असून, मिलन मेडिकलचे मालक मुजम्मिल मिर्झा व सज्जाद मिर्झा यांची लहान बहीण आहेत. त्यांच्या या यशामुळे मिर्झा कुटुंबात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रेरणादायी संदेश
आपल्या यशाबद्दल बोलताना अक्सा म्हणाल्या,
“कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते.”
निजामपूरच्या या लेकीच्या उल्लेखनीय यशामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला असून, तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, November 5, 2026
26°C
साफ आकाश
51 %
14 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!