नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर पोलिसांचा दणका: सुझलॉनचे केबल चोरणारे दरोडेखोर गजाआड.

सुझलॉन कंपनीची कॉपर केबल चोरणारे दरोडेखोर अटकेत; एकूण ३०,००० रू.किमतीचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – अकील शहा

साक्री:- निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील खोरी गावाचे शिवारात दिनांक २२/०२/२०२६ रोजी पहाटे ०४.३० वाजेच्या सुमारास सुझलॉन ग्लोबल सव्हिसेस प्रा.ली. कंपनीचे टॉवर क्रमांक के-३२ मधील ७८,०००/- रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०३४/२०२६ बीएनएस कलम ३१० (२),११५ (२) प्रमाणे दि.२२/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी १) ब्रिजेश मनिष व्दिवेदी वय-२० वर्षे रा. तुलसीपुर (करौंदा) ता. बिसवान, जि. सितापुर (उत्तरप्रदेश) २) ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे (भिल) वय-२५ वर्षे रा. मांडळ (दोंडाईचा) ता. शिंदखेडा, जि. धुळे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकुण ३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त केला असुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन ते पोलीस कोठडी रिमांडमधे आहेत तसेच त्यांचेकडुन गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोहेकों/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ/प्रशांत ठाकुर, पोहेकों/नागेश्वर सोनवणे, पोहेकों/प्रदिप आखाडे, पोकों/दिपक महाले, पोकों/राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकॉ/सागर थाटसिंगारे, पोकों/कृष्णा मिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/सुजित देवरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/सागर कांगणे, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मोहन माळी यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:28 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
2 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!