नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर एलसीबीची धडाकेबाज कारवाई

गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत


DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या आदेशानुसार एलसीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे (वय २७, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याचे समजले. त्यानुसार २३ फेब्रुवारी रोजी उड्डाणपुलाखाली सापळा रचून छापा टाकण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीच्या अंगझडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल (किंमत सुमारे ५० हजार रुपये) जप्त करण्यात आले. आरोपीकडून पिस्तूल कोठून आणले व कोणत्या हेतूने ठेवले होते, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस अंमलदार वैभव पाटील व त्यांच्या पथकाने केली.
एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसणार असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:27 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
2 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!