नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर उजळाईवाडीत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन🚨प्रतिनीधि: संजय दिंडे

कोल्हापूर:- जिल्हयातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई सुरू केली आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती. पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,एक तरुण उजळाईवाडीउड्डाणपुलाखालील चौकात पिस्तूल घेऊन येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने उजळाईवाडी येथे सापळा रचला. यावेळी ऋषिकेश ऊर्फ सोन्या रामु कु-हाडे (वय २७, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना ५०,००० रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत राऊंड मिळून आले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने हे पिस्तूल त्याचा मित्र विकास देवदास वाघमारे ऊर्फ पांडा शेट (रा. आझाद चौक, लक्ष्मीपुरी) याने दिल्याचे कबूल केले. या दोन्ही आरोपींच्या नावावर यापूर्वीही लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस दुसऱ्या आरोपीचा (विकास वाघमारे) शोध घेत असून पिस्तूल नेमके कोणाकडून आणि कशासाठी विकत घेतले होते, याचा अधिक तपास सुरू आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संपूर्ण टीमने यशस्वी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!