DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन देसाई
इचलकरंजी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी पथकाने कोल्हापूर–गगनबावडा मार्गावर मोठी कारवाई करत बनावट विदेशी मद्याचे रॅकेट उघड केले. या कारवाईत सुमारे 28 लाख 73 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. 25 फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकाने कोल्हापूर–गगनबावडा मार्गावर सापळा रचला. संशयित MH10-DV-3001 या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनातून बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. वाहनातून विविध ब्रँडच्या 180 मिलीच्या 384 सिलबंद काचेच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे घरगुती बंद गोदामात मोठ्या प्रमाणात बनावट मद्य साठवले असल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणाहून विविध ब्रँडच्या 180 मिलीच्या एकूण 4,800 काचेच्या बाटल्या, 108 बॉक्स तसेच एका कंपनीचे बनावट स्टीकर्स व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.या कारवाईत वाहनासह जप्त मद्याची एकूण किंमत सुमारे रूपये 28,73,480 इतकी आहे. त्यामध्ये मद्याची किंमत सुमारे रुपये 11,40,480 वाहनाची किंमत रूपये 17,00,000 व इतर साहित्याचा समावेश आहे.
या प्रकरणी दिग्विजय राजाराम पाटील (वय 40, रा. शिनोली, ता. चंदगड)शुभम हिमालय पंड्या (वय 44, रा. कोनिंग 55, बक्षीनगर, सांगली).इंद्रजित संजय कदम (वय 43, रा. रत्नागिरी, सांगली)
यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील कलम 65 (अ), (ब), (ड), (इ), (फ), 81, 83, 90, 103 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



