नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जतमध्ये ८८ हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता रंगेहाथ अटकेत

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतीनिधी रमजान मुलाणी

सांगली : सांगली जिल्हा परिषद शाळांच्या बांधकाम दुरुस्तीच्या बिलांना मंजुरी देण्यासाठी ८८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जत पंचायत समितीतील सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार (वय ५०, रा. मिरज) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्ती व इतर कामांची बिले मंजूर करून देण्यासाठी सुतार यांनी २ टक्के कमिशनची मागणी केली होती. संबंधित बिलांची मोजमाप नोंदवही तयार करून मंजुरीसाठी पुढे पाठविण्याच्या बदल्यात ही मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पडताळणीत ७८ हजार रुपये तसेच अतिरिक्त १० हजार रुपये अशी एकूण ८८ हजार रुपयांची मागणी निष्पन्न झाली. त्यानुसार जत पंचायत समिती येथे सापळा लावून रक्कम स्वीकारताना सुतार यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!