नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत अवैध गॅस रिफिलिंगवर छापा; १६ सिलेंडरांसह साहित्य जप्त, एकास अटक

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार

मिरज :- दि. 26 फेब्रुवारी 2026
मिरज तालुक्यातील वानलेसवाडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसील कार्यालय मिरज व जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकला. या कारवाईत एक जणाला ताब्यात घेण्यात आले असून १६ गॅस सिलेंडरांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर (मिरज) येथील किरण हरिसास मोसले हा व्यक्ती घरगुती एलपीजी गॅसचा वापर करून वाहनांमध्ये रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले. छाप्यात एकूण १६ घरगुती गॅस सिलेंडर सापडले. त्यापैकी ३ सिलेंडर भरलेले, ८ रिकामे आणि एचपीसीएल कंपनीचे ५ रिकामे सिलेंडर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय रिफिलिंगसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटार, वजनकाटा, दोन गॅस नोजल, गॅस पाइप, तसेच व्यवहारासाठी वापरला जाणारा गुगल पे क्यूआर कोड आदी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पुरवठा विभाग व तहसील प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केली असून तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली. अवैध गॅस रिफिलिंगसारख्या धोकादायक प्रकारांमुळे मोठी जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!