नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हेल्मेट सक्ती मोहिमेला यश; अपघातात प्राध्यापकाचा जीव वाचला, प्रशासनाचा संदेश ठळक

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला सकारात्मक यश मिळताना दिसत आहे. या मोहिमेचा प्रत्यक्ष फायदा एका अपघातातील घटनेत समोर आला असून, हेल्मेटमुळे एका प्राध्यापकाचा जीव वाचल्याची घटना घडली आहे.

दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता कोरीट येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत प्राध्यापक भरत चव्हाण हे त्यांच्या (MH 39 D 6916) क्रमांकाच्या दुचाकीने नोकरीसाठी जात होते. यावेळी त्यांनी नियमाप्रमाणे हेल्मेट परिधान केले होते.

समशेरपूर कारखान्याजवळ पोहोचताच त्यांच्या मागून आलेल्या (MH 18 BG 9358) क्रमांकाच्या आयशर ट्रकने उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनावरील ताबा सुटल्याने ते रस्त्यावर कोसळले. मात्र, त्यांनी हेल्मेट घातले असल्यामुळे त्यांच्या डोक्याला कोणतीही दुखापत झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातात त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या स्मित हॉस्पिटल, नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या मोहिमेबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनीही नागरिकांना आवाहन करत, “दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. हा नियम केवळ कायद्यापुरता मर्यादित नसून, तो प्रत्येकाच्या जीवित सुरक्षेसाठी आहे,” असे सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दल व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या वतीने सर्व दुचाकी चालकांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ही घटना हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचा ठोस संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:45 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!