नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत दुकानावर कोयत्याने हल्ला, सराईत गुन्हेगार अटकेत

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार

मिरज : मिरज शहरात भरदिवसा दुकानावर कोयत्याने हल्ला करून तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून सराईत गुन्हेगार प्रथमेश तांदळे (वय 28, रा. कमानवेस, मिरज) याने कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील मनोज कलेक्शन या दुकानात घुसून कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तांदळेला अटक केली आहे.
मनोज चव्हाण यांच्या दुकानावर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन वर्षांपूर्वी गॉगल खरेदीच्या कारणावरून झालेल्या वादातून तांदळे संतप्त झाला होता. त्याच रागातून तो कोयता घेऊन दुकानात शिरला. बाहेरील रॅकवर हल्ला करत काचा फोडल्या, तसेच दुकानदाराला धंदा करू देणार नसल्याची धमकी देत तो पळून गेला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीती पसरली असून व्यापाऱ्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस तत्काळ सक्रिय झाले.
पोलीस निरीक्षक किरण चौगुले व सहायक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या परिसरात फिरवून दहशतीविरुद्ध कडक संदेश दिला. यावेळी आरोपीच्या घरातून हल्ल्यात वापरलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्गात काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:45 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!