नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत भरस्त्यात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

जुन्या वादातून हल्ला – दोन आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) :– शहरात भरस्त्यात गोळीबाराची थरारक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. महासत्ता चौक ते सांगली रोड दरम्यान असलेल्या एस. व्ही. पालंकर ज्वेलर्स दुकान जवळ एका २२ वर्षीय तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी ओमकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी) याच्यावर पूर्वीच्या भांडणाच्या रागातून गोळीबार करण्यात आला.
या प्रकरणी अनुराग अमोल सूर्यवंशी (वय २०, रा. इचलकरंजी) आणि त्याचा साथीदार ओमकार संजय शेंडे (रा. इचलकरंजी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९, ३(५) तसेच आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू आहे.
या धाडसी गोळीबारामुळे इचलकरंजी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास इचलकरंजी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!