नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अॅड. चैतन्य भंडारी यांचे एसव्हीकेएम फार्मसी महाविदयालय येथे महिला सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

धुळे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एसव्हीकेएम फार्मसी महाविदयालय येथे महिलांसाठी व मुलींसाठी अॅड. भंडारी यांचे सायबर जनजागृती बाबत व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी महिलांसोबत होणा-या विविध ऑनलाईन फसवणुकीपासून त्यांनी स्वतःचे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले व मुलींनी आपले फोटोज, व्हिडीओ सोशल मिडीया अकाऊंटवर टाकण्याअगोदर काय काय प्रायव्हसी केली पाहिजे जेणेकरुन त्यांचे फोटोजचे गैरवापर होणार नाही याबाबत देखील सांगितले. आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या जगात प्रत्येकाला आपले फोटो अपलोड करण्याआधी विचार केला पाहिजे की आपण आपले स्वतःचे बायो मेट्रिक्स व फेशियल एक्सप्रेशन एका अज्ञात अॅप्लीकेशनला देत आहोत. तसेच आपले सोशल मिडीया अकाऊंट नेहमी लॉक करून ठेवावे व महिलांनी ऑनलाईलन शॉपिंग करतांना आपण ज्या अॅप किंवा वेबसाईटने शॉपिंग करत असाल ते अॅप किंवा वेबसाईट ही खरे आहे की फेक आहे याबाबत पुर्ण खबरदारी घ्यावी त्यानंतरच ऑनलाईनला शॉपिंगला प्राधान्य दयावे आणि जर तुम्हाला अज्ञात नंबरव्दारे पोलिसांच्या नावाने व्हिडीओल कॉल येत असेल व असे सांगण्यात येत असेल की आम्ही तुम्हाला डिजिटल अटक करत आहोत तर अशा फसव्या व्हिडीओ कॉलला उचलू नये कारण कायदयात अशी कुठेच तरतूद नाही की कुठलाही पोलिस अधिकारी तुम्हाला डिजिटल अटक करु शकतो. तसेच त्यांनी मुलींना असे देखील सांगितले की तुम्ही चेंजिग रुममध्ये जाण्याअगोदर स्वतःची सुरक्षितता कशी केली पाहिजे व हिडन कॅमेराचा शोध कसा घेतला पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली व त्यांना असे देखील ऑनलाईन सांगितले की जर एखादया मुलीसोबत कुठलाही सायबर गुन्हा झाला असेल किंवा कोणीही अज्ञात इसम त्यांना ऑनलाईन ब्लॅकमेल करीत असेल तर त्याला घाबरु नये. जर कोणत्याही मुलीसोबत असा प्रकार झाला असल्यास त्यांनी न घाबरता त्याविषयी १९३० या संकेतस्थळावर तकार करावी किंवा संबंधित सायबर सेल येथे तकार नोंदवावी. यावेळी एसव्हीकेएम कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. समीर गोयल, सौ. गोयल मॅडम व इतर शिक्षक वर्ग व महाविदयालयातील विदयार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:45 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!