नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रुख्माबाई बालिकाश्रमास राज्यस्तरीय पुरस्कार

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार : रुरल फाउंडेशन, नंदुरबार संचलित रुख्माबाई बालिकाश्रम, सोरपाडा (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) येथील बालगृहाला महाराष्ट्र राज्य महिला आयोग मार्फत आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

यावेळी बालगृहातील दोन मुलींनी अधीक्षिका यांच्या माध्यमातून हा पुरस्कार स्वीकारला.

या उल्लेखनीय यशाबद्दल रुरल फाउंडेशन, नंदुरबारचे अध्यक्ष प्रकाश बी. पाटील यांनी बालिकाश्रमातील सर्व मुली, अधीक्षिका तसेच कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच अक्कलकुवा कॅम्पस व बेलवेदर स्कूल, नंदुरबार प्रमाणेच संस्थेची प्रगती पुढेही अशीच होत राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या पुरस्कारामुळे रुरल फाउंडेशन, नंदुरबारच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला राज्यस्तरावर गौरव मिळाला असून संस्थेच्या कार्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:17 am, November 5, 2026
24°C
साफ आकाश
60 %
9 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!