DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- इचलकरंजी महानगरपालिका वार्ड नं.९ प्रभाग क्र.७ मधील साईट नं. १०२ पावर हाऊस जवळील, शीख वसाहत, साठे वसाहत परिसरातील गटारींची सफाई वेळेवर होत नाही. त्याच बरोबर कचरा उठाव वेळेवर होत नाही. त्यामुळे या भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्यामध्ये साथींच्या रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयाची वेळेवर स्वच्छता होत नाही. शौचालयाच्या दरवाज्यांची मोडतोड झालेली आहेत . तात्काळ दुरुस्ती होऊन दरवाजे बसविण्यात यावी. शौचालयांची स्वच्छता व्हावी. त्याचप्रमाणे याभागात इलेक्ट्रीक सर्व्हिस वायर झाडाझुडपांपासून गेल्या असून त्या वायरी खाली झुलत आहे. त्या झाडांच्या फांद्यांची छाटणी होणे आवश्यक आहे अशा सार्वजनिक बाबींचे निवेदन दलित समाज विकास परिषदेचे इचलकरंजी शहर संघटक बाळकृष्ण हत्तीकर यांनी महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांना दिले. इचलकरंजीचे महापौर व उपमहापौर यांनी तात्काळ कामे मार्गी लावू असे आश्वासन दिले.



