DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- कोल्हापूर शहरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर आणि इतर साहित्य त्यांच्याकडून जप्त केले आहे.१६ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर रेल्वे स्टेशन समोर काही व्यक्ती बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून बाजारात विकण्याचा प्रयत्न करत होते. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी पोलिसांना ५०० रुपयांच्या एकूण २६२ बनावट नोटा (एकूण किंमत १,३१,००० रुपये) मिळून आल्या.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आज, २५ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी मोहन पोवार ऊर्फ देवा भाऊ (वय २५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला अटक केली. तपासादरम्यान त्याच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी राहुल प्रकाश खिरुगडे (वय ३३) या.पाडळी खुर्द जिल्हा कोल्हापूर,गुरु राजेंद्र मेंगाणे (वय २३) रा.गजबरवाडी ता.निप्पाणी जिल्हा बेळगाव
राहुल अभिमान रसाळ (वय २०)व मोहन पोवार (वय २५) दोघे राहणार राजेंद्र नगर कोल्हापूर अशी नावे आहेत.
पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, सागर गुणवरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे करत असून, यामागे आणखी काही मोठे रॅकेट आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.



