नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजमध्ये पोलिसांनी ‘खाकी पॅटर्न’ दाखवला; गुन्हेगारांवर सार्वजनिक कारवाई

मिरज प्रतिनिधी-राजेंद्र पवार

मिरज, दि.30/03/2026 : मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले आणि त्यांच्या पथकाने शहरातील गुन्हेगारी टोळक्यांविरुद्ध कडक भूमिका घेत ‘नवी यंत्रणा’ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. सोमवारी सकाळी शहरातील शिवतीर्थ परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळीचा म्होरक्या सौरभ पोतदार याच्यासह त्याचे साथीदार आकाश फोंडे व ओंकार साळुंखे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून लोखंडी हत्यारे तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना पुढील तपासासाठी घटनास्थळ पाहणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील ‘ब्रदर्स अड्डा’ या कॉफी सेंटर परिसरात आणण्यात आले. यावेळी पोलिसांनी उपस्थित नागरिकांसमोरच कठोर कारवाई करत ‘खाकी पॅटर्न’ची झलक दाखवली. पोलिसांचा दरारा पाहताच आरोपींनी हात जोडून माफी मागत जमिनीवर लोळण घेतल्याचे दृश्य उपस्थितांनी पाहिले. या कारवाईनंतर मिरजकर नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, पोलिसांच्या या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिक, महिला व कष्टकरी वर्गाला त्रास देणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, मिरज शहर पोलीस गुन्हेगारीविरोधात अधिक प्रभावी पद्धतीने कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:16 pm, March 31, 2026
36°C
कुछ बादल
24 %
5 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 21%
Visibility: 10 km
Sunrise: 6:25 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!