नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu

शेअर करा:

३६ वी ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६’ मुंबईत रंगणार; ३७०० खेळाडूंचा सहभाग

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी विराज गंगावणे

मुंबई – महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा थरार २० एप्रिलपासून मुंबईत सुरू झाला असून २७ एप्रिलपर्यंत हा क्रीडा महोत्सव रंगणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ३७०० महिला व पुरुष खेळाडू, पंच आणि अधिकारी सहभागी झाले आहेत.
या स्पर्धांमध्ये एकूण १८ क्रीडा प्रकारांचा समावेश असून ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वांदो, वु-शु, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, क्रॉसकंट्री आणि जलतरण अशा विविध खेळांमध्ये पोलीस आपले कौशल्य सादर करत आहेत.
स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सशस्त्र पोलीस मैदान कलीना येथे होणार असून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
तर २७ एप्रिल रोजी दुपारी ४:१५ वाजता समारोप व बक्षीस वितरण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी सदानंद दाते व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धा मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलीस मुख्यालय कलीना, सशस्त्र पोलीस मरोळ मैदान, मुंबई विद्यापीठ संकुल, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि एम. एच. ए. चर्चगेट मैदान यांचा समावेश आहे.
तसेच २६ एप्रिल रोजी गोरेगाव येथील फोर्स वन शूटिंग रेंज येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा केवळ क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन नसून पोलीस दलातील एकजूट, शिस्त आणि फिटनेसचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:28 pm, April 28, 2026
40°C
साफ आकाश
12 %
37 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:02 am
Sunset: 6:53 pm
Translate »
error: Content is protected !!