नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu

शेअर करा:

जैनापूर ग्रामपंचायतीतील सरपंच व मुलावर लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन कोळी

कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीतील सरपंच व त्यांच्या मुलाविरोधात लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नींच्या नावे “ग्रीन गेट” या नावाने शेडनेट व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत जैनापूर येथे परवानगीसाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी तक्रारदार यांनी सरपंच संगिता रमेश कांबळे यांची भेट घेतली सरपंच यांनी काम करून देण्यासाठी १०,००० रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी तक्रारीची पडताळणी करताना सरपंच संगिता कांबळे व त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी १०,००० रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ९,००० रुपयांवर लाच निश्चित केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईचे आयोजन केले. सापळा कारवाईदरम्यान सरपंच व त्यांच्या मुलाने तक्रारदार यांचे काम पूर्ण झाले नसल्याचे कारण देत लाचेची रक्कम
स्वीकारण्यास नकार दिला.काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे घेऊ असे त्यांनी सांगितले.या सर्व प्रकारावरून सरपंच संगिता रमेश कांबळे (वय ५२) व त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे (वय ३०) यांच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:25 pm, April 28, 2026
41°C
साफ आकाश
10 %
38 Km/h
Wind Gust: 34 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:02 am
Sunset: 6:53 pm
Translate »
error: Content is protected !!