नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळीत “तगतराव रथ लोकार्पण सोहळा” सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या वातावरणात मोठ्या थाटामाटात पार पडला.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा

साक्री :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथे महाराष्ट्र दिन (१ मे) निमित्त गावाची ग्रामदैवत असलेल्या येडूबाई मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित “तगतराव रथ लोकार्पण सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या वातावरणात मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याने केवळ धार्मिक परंपरेचे जतन केले नाही, तर गावातील एकोप्याची आणि निस्वार्थ सेवाभावाची प्रेरणादायी झलक सर्वांसमोर उभी केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव लक्ष्मण साळुंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, पिंपळनेर नगरपरिषदेचे नगरसेवक संभाजी शिवाजीराव अहिरराव, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, शेवाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगलाताई प्रकाश भदाणे तसेच उपसरपंच पंढरीनाथ (तात्या) साळुंके आणि उत्तम इंजिनिअरिंग वर्क्स, निजापूरचे किशोर वाघ व डॉ. मुकुंद बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवाजी माध्यमिक विद्यालय, शेवाळीच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्राम सुधार मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

प्रमुख पाहुणे चंद्रजीत सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात शेवाळी गावाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “हे गाव पुरोगामी विचारांचे असून, येथे कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असले तरी गावाच्या विकासासाठी सर्वजण एकदिलाने कार्य करतात.” त्यांनी गावातील अनेक सार्वजनिक कामे लोकवर्गणीतून पूर्ण झाल्याचे उदाहरण देत ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि समाजाभिमुख वृत्तीचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे दगाजी विठ्ठल साळुंके यांचे योगदान. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतांनाही त्यांनी ग्रामदैवत येडूबाई मातेसाठी तगतराव रथ स्वतःच्या खर्चातून तयार करून अर्पण केला. त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत कठीण होती अडचणींवर मात करत गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी कायम ठेवली.

निंबाजी साहेबराव साळुंके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दगाजी आप्पा हे नेहमी भाऊबंदकी व आपल्या मोठ्या भावांचा व पुतण्यांचा विकासाचा विचार करत असतात आणि गावाच्या कामासाठी चिंताग्रस्त असतात. स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी झटणारी ही व्यक्ती खरोखरच प्रेरणादायी आहे.”

दगाजी विठ्ठल साळुंके यांनी हा रथ आपल्या स्वर्गीय वडील विठ्ठल बुलंद साळुंके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण केला. त्यांच्या वडिलांचा यात्रेशी असलेला जिव्हाळा, पारंपरिक कार्यातील सहभाग आणि गावाविषयीची निष्ठा याच प्रेरणेने हा रथ साकार झाला. हा केवळ धार्मिक उपक्रम नसून वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता आणि त्यांना दिलेली श्रद्धांजली ठरली.

प्रास्ताविक करताना अरुण दादा साळुंके यांनी गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी नमूद केले की, गावातील मंदिर व विविध कार्यक्रम लोकवर्गणीतून पार पडले असले तरी एखाद्या व्यक्तीने पूर्ण कार्यक्रम स्वतःच्या खर्चातून उभारण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रूपचंद साळुंके व आबासो निंबाजी साहेबराव साळुंके यांनी केले.

या सोहळ्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये एडवोकेट मोहन साळुंके, दीपक साळुंके, अरुण नेरकर, नितीन साळुंके, बंडू नांद्रे, नितीन नांद्रे (डॉक्टर), राजेंद्र साळुंके, सचिन साळुंके, ग्रामपंचायत सदस्य केतन साळुंके, विमलबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीदार साळुंके, पोपट गंगाराम साळुंके, अशोक सुकलाल भदाणे, पोपट हरी साळुंके, नंदू साळुंके, सागर साळुंके, दीपक साळुंके, यादराव साळुंके, पंडित आण्णा साळुंके, दौलत साळुंके, भिला डोंगर साळुंके यांसह अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांचा समावेश होता.

या भव्य आणि यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन दगाजी विठ्ठल साळुंके, गोकुळ विठ्ठल साळुंके आणि संतोष विष्णु साळुंके यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

एकंदरीत, हा रथ लोकार्पण सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता सामाजिक बांधिलकी, एकजूट, त्याग आणि गावाविषयीच्या प्रेमाचा जिवंत आदर्श ठरला. दगाजी विठ्ठल साळुंके यांच्यासारख्या व्यक्तींमुळे समाजात माणुसकी, निस्वार्थ सेवा आणि संस्कृतीची परंपरा जिवंत असल्याची जाणीव या कार्यक्रमाने सर्वांना करून दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:34 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!