नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’; ५४४ वाहन चालकांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी: संजय दिंडे

कोल्हापूर: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राबवलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ६ आणि ७ मे रोजी रात्री झालेल्या या मोहिमेत एकूण ४२ पथकांनी जिल्ह्याची झाडाझडती घेतली.
या कारवाईत मद्यपान करून वाहन चालवणारे ३४ जण आणि वाहतूक नियम मोडणाऱ्या ५४४ चालकांकडून ३.५३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ७ लाख रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून ३९ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.
फरारी आरोपी जेरबंद ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी महेश आहेर याला नरंदे (ता. हातकणंगले) येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी ठाणे क्राईम युनिटच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:34 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!