नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वन्यजीव शिकार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शबगीर जमादार अटकेत.उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड

कोल्हापूर चंदगड वन्यजीव शिकार प्रकरणात वनविभाग चंदगडने मोठी आणि निर्णायक कारवाई करत मुख्य सूत्रधार आरोपी शबगीर दस्तगीर जमादार (रा. दानोळी) यास अटक केली आहे. सदर कारवाई वनपाल कानूर खुर्द यांच्याकडील वनगुन्हा क्र. WL 01/2025, दि.13 डिसेंबर 2025 अंतर्गत करण्यात आली.या प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तुकाराम अमृसकर, रियाज जमादार, अमीन मुजावर, दिगंबर अनगुडे, इर्शाद नदाफ, दाऊद नदाफ, अन्वर पटेल आणि यासिन उर्फ बबलू नदाफ यांचा समावेश असून हे सर्व आरोपी सध्या जामिनावर आहेत.
वनविभागाच्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार शबगीर जमादार व लखन हेगडे हे दीर्घकाळ फरार होते.आरोपी शबगीर जमादार याने प्रथम गडहिंग्लज जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र न्यायालयाने दि.23 जानेवारी 2026 रोजी तो अर्ज फेटाळला.
त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली. सुनावणीदरम्यान वनविभागाच्या तपास पथकाने मोबाईल सीडीआर,तांत्रिक पुरावे छायाचित्रे आणि अन्य महत्वाची माहिती
न्यायालयासमोर सादर केली. आरोपी गुन्ह्याच्या दिवशी रेनॉल्ट डस्टर
MH-04-GE-0938 या वाहनात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या वाहनातून धारदार व टोकदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून वन्यप्राण्यांचे आक्षेपार्ह छायाचित्रे तसेच वन्यजीव शिकार आणि बेकायदेशीर हालचालींसाठी वापरले जाणारे व्हॉट्सॲप ग्रुप आढळून आले.या ग्रुपमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती, हॉटेल व्यावसायिक व इतर सदस्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याचा अधिक तपास सुरू आहे.
वनविभागाने सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे मा. उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाने दि.30 एप्रिल 2026 रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आरोपी शबगीर जमादार हा दि. 6 मे 2026 रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय चंदगड येथे हजर झाला असता त्यास अटक करण्यातआली.
दि.7 मे रोजी आरोपीस प्रथम वर्ग न्यायालय चंदगड येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने वनविभागाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दि.11 मे 2026 पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
दरम्यान या प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी लखन हेगडे (रा. माणगाववाडी) याचा शोध सुरू असून वनविभागाचे तपास पथक त्याच्या मागावर असल्याची माहिती देण्यात आली.संपूर्ण कारवाईत उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड,वनपाल चंद्रकांत पावस्कर आणि वनरक्षक विकास राऊत यांनी तपास केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:49 am, May 17, 2026
36°C
साफ आकाश
27 %
24 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 5:52 am
Sunset: 7:01 pm
Translate »
error: Content is protected !!