नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळीत दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार!

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा

साक्री: नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत शेवाळी (दा.) ता.साक्री येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील घवघवीत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.१० मे रविवारी रोजी गावातील कै.अरविंद चौक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक करण्यात आले.

*विद्यार्थ्यांचे यश*

परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

*प्रथम क्रमांकः मानव सचिन साळुंके ९३.८०%.*

*द्वितीय क्रमांकः पलक किशोर मोरे ९२.४०%.*

*तृतीय क्रमाक : ऋतिका सतीष साळुंखे ९१%.*

विद्यालयात दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी मानव साळुंके याचा सत्कार ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव साळुंके व साक्री प.स.मा. उपसभापती नितीन साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला तर द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी पलक मोरे हिचा सत्कार श्री.दिलीप साळुंके व श्री.शामराव साळुंखे यांनी केला व तसेच तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी अनुप अनुपस्थित असल्याकारणाने आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ तिच्या पालकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्री दीपक साळुंखे यांनी दहावीतील विद्यार्थ्यांच्या यशासाठी मेहनत घेणाऱ्या विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे ही आभार मानले.
सदर कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ वारकरी श्री.अशोक भगवान साळुंके यांनी ही धुळे जिल्ह्यातून भारुड सादरीकरण गटातून प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे त्यांचा ही सत्कार ग्राम सुधार मंडळाचे सदस्य रमेश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मा. सरपंच दगाजी साळुंके, ग्राम सुधार मंडळाचे सदस्य एन.एस साळुंखे, प्रभाकर साळुंके, उखाजी साळुंके, राजेंद्र साळुंके, प्रशांत साळुंके, संदीप साळुंके, भुषण साळुंके, रमेश साळुंके, सुरेंद्र नेरकर, सचिन साळुंके हितेश नेरकर व तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:35 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!