नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाई; पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पाच जणांना अटक

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : संजय दिंडे

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून पाच आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण १,१६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:
दिनांक १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास, हरी ओमनगर येथील इस्कॉन मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या प्लॉटिंगमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ओढ्याजवळील झाडाच्या आडोशात छापा टाकला. यावेळी आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी ‘तीन पानी’ नावाचा पत्त्याचा जुगार खेळताना आढळले.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. ओमकार सोपान वीर (वय ३४, रा. संतोष कॉलनी, साने गुरुजी वसाहत).
२. जुबेर अब्दुल पठाण (वय ३१, रा. राजोपाध्येनगर).
३. अनिल अशोक ढवळे (वय ३३, रा. राजोपाध्येनगर).
४. प्रकाश वसंत हडदरे (वय ३३, रा. आपटेनगर).
५. गजानन सौदागर शिंदे (वय ४५, रा. राजोपाध्येनगर).
6.
जप्त केलेला मुद्देमाल:
रोख रक्कम: १६०० रुपये.
मोबाईल: ७००० रुपये किमतीचे तीन हँडसेट (सॅमसंग कंपनीचे).
वाहने: ५५,००० रुपये किमतीची होंडा स्लेंडर मोटारसायकल (MH-09-DU-7377) आणि ४५,००० रुपये किमतीची होंडा डीओ मोपेड (MH-09-FA-4617).
इतर: जुगाराचे साहित्य आणि पत्त्याची पाने.
याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप शंकरराव घाटगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:48 am, May 17, 2026
36°C
साफ आकाश
27 %
24 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 5:52 am
Sunset: 7:01 pm
Translate »
error: Content is protected !!