नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

“गुन्ह्यातील फिर्यादीच निघाला चोर”घरफोडीचा बनाव उघड २.८० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत धक्कादायक सत्य समोर आणले आहे. घरफोडीची तक्रार देणारा फिर्यादीच स्वतः चोर निघाल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.दि.९ मे २०२६ रोजी चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान महेश सुभाष पाटील यांनी त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १३२/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५(अ), ३३३, ३(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तयार करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अंमलदार दिपक घोरपडे व प्रविण पाटील यांना गोपनीय महत्त्वाची माहिती मिळाली.
राजगोळी बुद्रुक येथील महेश पाटील यांनीच स्वतःच्या घरातील चोरीचा बनाव रचल्याची माहिती मिळाली. तसेच तो चोरीतील दागिने घेऊन कागल-मुरगूड मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार असल्याचे समजले.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी महेश सुभाष पाटील याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक चौकशीत महेश पाटील याने गुन्ह्याची कबुली दिली. शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःच्या घरात चोरी केली.मात्र घरच्यांना आणि इतरांना संशय येऊ नये म्हणून स्वतःच पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केल्याचे त्याने सांगितले.
आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी चंदगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिष म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार दिपक घोरपडे, प्रविण पाटील, समीर कांबळे, अरविंद पाटील, अनिल जाधव आणि सचिन दुधाने यांच्या पथकाने पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:48 am, May 17, 2026
36°C
साफ आकाश
27 %
24 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 5:52 am
Sunset: 7:01 pm
Translate »
error: Content is protected !!