नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन महिलांसह रिक्षाचालक अटक,६ गुन्हे उघड

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- संजय दिंडे कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील महिलांसह दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे २ आणि चोरीचे ४ असे एकूण ६ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी ८,५०,४७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.६ मे २०२६ रोजी कसबा बावडा राजाराम बंधारा येथे सापळा रचून संशयित आरोपी सुनिता उर्फ बारकी दगडू गोसावी (वय ३७, रा. वडणगे)नानुबाई राजू गोसावी (वय ५० रा.वडणगे)
अण्णासाहेब रुद्राप्पा चौगुले (वय ४६, रा.कणेरीवाडी) रिक्षाचालक संजय सोमा सरवदे (वय ४१, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) रिक्षाचालक गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३ आणि करवीर पोलीस ठाण्यांतर्गत ३ असे एकूण ६ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये नदीवरील मोटर केबल चोरी, एमआयडीसी कारखान्यातील जॉब व सॅनिटरी वेअर दुकानातील चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.आरोपींच्या ताब्यातून रिक्षा,मोटर केबल, मोटर पंप, व्हायब्रेटर, ॲल्युमिनियम जॉब आणि सॅनिटरी वेअर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:34 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!