DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी निवास गागडे
हातकणंगले – प्रभाग क्रमांक १० मधील महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी परिसरातील अनेक दिवसांपासूनचा पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला असून इचलकरंजीचे कार्यसम्राट आमदार राहूल आवाडे यांच्या स्वनिधीतून मंजूर करण्यात आलेल्या नवीन बोरचे उद्घाटन प्रमुख उपस्थितीत नगरसेवक रवि रजपुते यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. प्रभाग क्रमांक १० चे कार्यतत्पर नगरसेवक रवी रजपुते यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीच्या गाळ्याच्या रिकाम्या जागेत ही नवीन बोर तयार करण्यात आली.
नवीन बोरचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर लगेचच बोरमधून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने परिसरातील महिला व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी महिला वर्गाने नगरसेवक रवी रजपुते यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमावेळी महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन धनाजी दोईफोडे यांच्या हस्ते नगरसेवक रवी रजपुते यांना मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित नागरिकांनी आमदार राहुल आवाडे व नगरसेवक रवी रजपुते यांच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन गणेश जाधव, निवास गागडे, अमित ठाणेकर, संचालक विष्णुपंत नेतले, धोंडीराम मांगलेकर, बाबुराव भंडारे, संचालिका शहनाज मोमीन, किरण ठाणेकर, सुभाष उकिरडे, संभाजी पालकर, राजेश लाहोटी, रंगराव चौगुले, रोहित रजपूते ,कुणाल जावळे, लखन हेगडे, संकेत जाधव, अब्बास तेली, सुजल गुरसाळे, राहुल हांडे, तुषार कांबळे यांच्यासह महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



