नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन; वीज बिल व स्मार्ट मीटरची प्रतीकात्मक होळी

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज : महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाने आज आक्रमक भूमिका घेत एमएससीबी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी वीज बिले व प्रतीकात्मक स्मार्ट मीटरची होळी करत महावितरणविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर, सुरेश भोसले व युवासेना प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांची कोणतीही संमती घेतली जात नसून, चोरीछुप्या पद्धतीने मीटर बसवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, महागाईच्या काळात जनतेवर आणखी आर्थिक भार टाकण्याचा हा प्रकार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबवून जनतेच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा महावितरणविरोधात आणखी तीव्र स्वरूपाचे ‘चाबूक फोड आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:40 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
62 %
11 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 80%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!