नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

करवीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दारू तस्करांवर छापा

करवीर पोलिसांची मोठी कारवाई; १३.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन तस्कर जेरबंद

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे

कोल्हापूर : करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर धडक कारवाई करत तब्बल १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दारूसह दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत करवीर पोलिसांना ही मोठी यशस्वी कारवाई करता आली. गुप्त माहितीच्या आधारे कळंबा परिसरात सापळा रचून एका चारचाकी वाहनातून ३१ हजार ८०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी शहाजी साताप्पा बर्गे (वय ४८ रा. अर्जुनवाड) याला ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर मिळालेल्या दुसऱ्या माहितीवरून नवीन वाशी नाका परिसरात टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यामधून २ लाख ७७ हजार ७७५ रुपयांची देशी-विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी मुबीन अजिज शेख (वय २६ रा. शिवाजीनगर, पुलाची शिरोली) याला अटक करण्यात आली.
दोन्ही कारवायांमध्ये दारूसह चारचाकी वाहन व टेम्पो असा एकूण १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:11 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!