नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेतील प्राणघातक हल्ला प्रकरणी सहा संशयित ताब्यात; चारचाकीसह आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज : टाकळी रोड परिसरात प्रदीप उर्फ शिव अथणीकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने कारवाई करत मतीन काझी, शौकत शेख, आयान लांडगे, शोएब शेख, शाकीब खान तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
सर्व आरोपींना मिरज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईची माहिती मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारककर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मिरज शहर पोलीस ठाणे व इतर पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:52 am, June 9, 2026
30°C
साफ आकाश
58 %
24 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!