नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुपवाड पोलिसांची धडक कारवाई : गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेला संशयित जेरबंद, धारदार कोयता जप्त!

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाइम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार

मिरज:- कानडवाडी रोडवर संशयास्पद हालचाली; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला?
कुपवाड येथील कानडवाडी जुन्या रस्त्यालगत वनविभाग कार्यालयासमोरील परिसरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत फिरणाऱ्या एका संशयित तरुणाला कुपवाड पोलिसांनी तातडीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्याच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, कुपवाड पोलीस ठाण्यातील गुप्त विभागाचे हवालदार संदीप घरते हे बुधवारी सायंकाळी गस्तीवर असताना संबंधित तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव महादेव शिंदे असल्याचे सांगितले.
चौकशीदरम्यान शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्याकडील धारदार कोयता जप्त केला.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी घटना टळल्याची चर्चा सुरू असून, पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:53 am, June 9, 2026
30°C
साफ आकाश
58 %
24 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!