नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत अवैध दारू, बनावट दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

बनावट दारू प्रकरणाच्या मुळापर्यंत राज्य उत्पादन शुल्क, जबाबदार पोलिस प्रशासन जाणार ?

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाइम🚨प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इचलकरंजी विभागाने अवैध मद्यविक्री व साठवणुकीविरोधात विशेष मोहीम राबवत शहरातील विविध भागांत धडक छापेमारी केली. या कारवाईत देशी, विदेशी तसेच गावठी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गणेश नगर, विक्रम नगर व शहापूर परिसरात एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेली देशी, विदेशी व गावठी दारू जप्त करण्यात आली. संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी व उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अलीकडेच पुणे परिसरात गावठी दारू सेवनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य व जीविताचे संरक्षण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून इचलकरंजी परिसरातील बेकायदेशीर मद्यविक्री रोखण्यासाठी यापुढेही सातत्याने अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहापूर परिसर, विक्रम नगर व गणेश नगर भागात अलीकडे उघडकीस आलेल्या बनावट दारू प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांत बेकायदेशीर मद्यविक्रीचे प्रकार सुरू असल्याच्या चर्चांना या कारवाईमुळे पुन्हा एकदा उधाण आले आहे. शहरात बनावट दारू, अवैध मद्यविक्री तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्यपूर्ण व प्रभावी मोहीम राबविण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या धोकादायक व्यवसायांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. शहरातील इंडस्ट्री परिसर, झोपडपट्टी परिसरात तसेच निवासी वस्त्यांमध्ये अशा प्रकारचे प्रकार सुरू असल्यास त्याचा परिणाम तरुण पिढीवर आणि सामाजिक वातावरणावर होत आहे. त्यामुळे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क या यंत्रणांनी केवळ अधूनमधून कारवाई न करता नियमित तपासणी, गुप्त माहिती संकलन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात. शहरातील विविध भागांत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. बनावट व बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कठोर भूमिका घेत दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतुन व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:52 am, June 9, 2026
30°C
साफ आकाश
58 %
24 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!