DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकान बेकायदेशीररित्या धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला अटक करून त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास यादवनगर मेन रोड परिसरात एक व्यक्ती हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल नितीश बागडी यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. आरोप शुभम किशोर डावाळे वय ३०, रा. यादवनगर मेन रोड, कोल्हापूर याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल नितीश बागडी यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी आरोपीला दि. ८ जून २०२६ रोजी अटक करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्रमांक ३ समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पोलीस हवालदार दिलीप पाटील, रंगराव चव्हाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल नितीश बागडी, अमोल पाटील, सचिन पाटील, शाह तळेकर आणि विशाल यांच्या पथकाने कारवाई केली.



