नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

टर्न घेताना चारचाकीचा ताबा सुटला; वाहन थेट घरात घुसले घराचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : राजेंद्र पवार

मिरज:- शहरातील मंगळवार पेठ परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. बॉम्बे स्टार बेकरीसमोर टर्न घेत असताना चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने प्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर थेट एका घरात घुसल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अंदाजे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चारचाकी वाहन वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन भरधाव वेगाने पुढे गेले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यानंतर वाहन थेट समोरील घरात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात घरमालक इम्तियाज सौदागर यांच्या घराचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपघाताच्या वेळी घरात अथवा परिसरात कोणीही वाहनाच्या मार्गात नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस तसेच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, घरमालक इम्तियाज सौदागर यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच नुकसानीचा योग्य पंचनामा करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:20 am, June 11, 2026
30°C
टूटे हुए बादल
58 %
18 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!