नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रतिबंधित गुटख्याचा काळाबाजार उघड; करवीर पोलीसांची मोठी कारवाई

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे

कोल्हापूर : ता. करवीर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात करवीर पोलिसांनी धडक कारवाई करत हळदी गावातील एका विक्रेत्याला जेरबंद केले. या कारवाईत गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा साठा असा एकूण ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत करवीर पोलिसांना हळदी गावात एका दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून छापा टाकला.
छाप्यामध्ये दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दुकानचालकाला ताब्यात घेतले तरआणि संपूर्ण माल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल ४७ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि संबंधित कलमान्वये आरोपी खंडेराव मनोहर नाईक (वय ४५रा. स्वामी समर्थ गल्ली, हळदी ता.करवीर ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध मालाचा पुरवठा नेमका कुठून होत होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुहास पवार, पो.अंमलदार रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तुळसकर, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी केले या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:52 pm, June 10, 2026
34°C
घनघोर बादल
42 %
36 Km/h
Wind Gust: 38 Km/h
Clouds: 92%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!