DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर : ता. हातकणंगले, जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायाविरोधात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत एका आरोपीसह तब्बल ४ लाख ३ हजार ६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेते आणि तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमेअंतर्गत एलसीबीचे पथक गस्त घालत होते. दरम्यान, इचलकरंजी शहर परिसरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने इचलकरंजी मऱगुबाई मंदिर ते पंचगंगा नदी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला.
संशयित वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह वाहन असा एकूण ४ लाख ३ हजार ६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपी धोंडीराम बाळकृष्ण निर्मळे (वय ५०रा.धनगर माळ,कोरोची ता.हातकणंगले) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इचलकरंजी पोलीस करत आहेत. जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.



