DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी - नारायण कांबळे
कोल्हापूर : इचलकरंजी उपविभागातील इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी व कुरुंदवाड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारां गुन्हेगारीवर्तनातुन सुधारणा व्हावी तसेच गुन्हे प्रतिबंध होण्याकरीता सदर आरोपींना शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे प्रतिबंधक कारवाईची विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत तब्बल १८२ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली, तर ११३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निलोत्पल , अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मोका गुन्ह्यातील आरोपी, दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार, जेलमधून सुटलेले आरोपी, हिस्ट्रीशीटर,गॅंगहिस्टीशिट ,वॉरंट आरोपी तसेच अमली पदार्थ विक्रीशी संबंधित आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. आरोपींची सविस्तर माहिती संकलित करून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विशेष मोहिमेदरम्यान ७ वॉरंटधारक आरोपींना अटक करण्यात आली, तर २ आरोपींना जेलमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.



