नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एनडीपीएस मोहिमेत शहापूर पोलीसांची मोठी कारवाई; तीन इसम जेरबंद, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर : ता. हातकणंगले इचलकरंजी शहरालगत कोरोची

गावांमध्ये
शहापूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत तीन इसमांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून २ किलो २८९ ग्रॅम गांजा, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व दुचाकी असा एकूण २ लाख ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी अरविंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंग (वय २४ रा.मुळ उत्तर प्रदेश, सध्या रा. कोरोची ता.हातकणंगले ) मोहसीन इर्शाद सनदी (वय २४ रा. कबनूर ता. हातकणंगले ) सार्थक श्रीप्रसाद बिंन्द (वय २० रा. सध्या कोरोची,मुळ उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून गांजा विक्री व पुरवठ्याबाबत अधिक चौकशी सुरू असून या रॅकेटमागील इतर धागेदोरे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या एनडीपीएस विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, शशिकांत ढोणे,सतिश कुंभार,उदय पाटील, रोहित डावाळे, या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:54 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
57 %
10 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 79%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!