नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री पोलिसांची धडाकेबाज कामगिरी;चौघांच्या टोळीकडून 18 मोटरसायकली हस्तगत करून 9 गुन्ह्यांची केली उकल.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा

साक्री: धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांनी जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या मोटरसायकली व चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते त्या अनुषंगाने साक्री शहरासह परिसरातील दुचाकी चोरांचा तपास कार्य हाती घेवून साक्री पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावून मोठी कामगिरी केली आहे. एकूण 18 मोटरसायकली जप्त करून नऊ गुन्ह्यांची उकल केली आहे आणी चार आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार दि.9/6/2026 रोजी साक्री पोलीस स्टेशन गु.र.नं. 168/2026 BNS क. 303(2) हया मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत असतांना दि. 12/06/2026 रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपक वळवी यांना प्राप्त गोपनीय माहितीचे आधारे सापळा रचून (1) निलेश रमेश खैरनार, वय 32 वर्ष यास म्हसदी ता. साक्री जि.धुळे येथून साक्री पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्याने व त्यांच्या साथीदारांनी मोटरसायकली चोरी केल्या बाबत सांगितले. फरार साथीदार (2) दिशांत रामदास अहिरे, वय-26 वर्ष, (3) विधिसंघर्षग्रस्त बालक व (4) विशाल राजेंद्र अहिरे, वय-24 वर्ष, सर्व रा. जायखेडा ता.सटाणा जि. नाशिक अशांनी संगणमत करुन साक्री व आजुबाजुच्या परिसरातुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी सांगितल्या प्रमाणे लपवून ठेवलेल्या एकूण 7,45,000 रू.किमतीच्या हिरो,बजाज कंपनीच्या18 मोटर सायकली ताब्यात घेतल्या.
सदर मोटरसायकलीचे इंजिन क्रमांक व चेचीस क्रमांका वरून पडताळणी केली असता मोटरसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकारे 3 आरोपी व 1 विधीसंघर्षग्रस्त बालक अशा चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक राजू जाधव करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनिरी. दिपक वळवी, सपोनि. अनिल बागुल, सपोनि. विकास शेवाळे, पोउनि प्रसाद रौंदळ, पोउनि. राजु जाधव आणि पोलीस अंमलदार बापु रायते, संदीप सावळे, मयुर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, सुशिलकुमार सुर्यवंशी व अमोल पाटील अशांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:32 am, November 6, 2026
23°C
साफ आकाश
39 %
4 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!