नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सम्राट अशोकनगर येथे ‘श्रद्धादीप शुद्ध पेयजल’ केंद्राचे लोकार्पण

एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी; परिसरातील नागरिकांना २४ तास पाणीसेवा

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी निवास गागडे

इचलकरंजी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सम्राट अशोकनगर येथे ‘श्रद्धादीप शुद्ध पेयजल’ केंद्राचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सागर राणे यांनी या शुद्ध पेयजल प्लांटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या केंद्राचे उद्घाटन भागातील नगरसेवक रवीसाहेब रजपुते व महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन धनाजी डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शुद्ध पेयजल केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना एक रुपयात एक लिटर, पाच रुपयात दहा लिटर आणि दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून, २४ तास ही सेवा सुरू राहणार आहे.
या सुविधेचा लाभ नेहरूनगर, आवळे गल्ली, लालनगर, सम्राट अशोकनगर, मुक्तसैनिक व भाग्यश्री कॉलनी परिसरातील नागरिकांना होणार आहे. परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवक रवी रजपुते व चेअरमन धनाजी डोईफोडे यांना सागर राणे यांच्या वतीने वृक्षभेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच सागर राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी गणेश जाधव, निवास गागडे, अमित ठाणेकर, अमित पाडळे, प्रशांत कांबळे, संकेत जाधव, अब्बास तेली, तुषार कांबळे, योगेश कांबळे, क्रिश मिणेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:51 am, August 17, 2026
27°C
घनघोर बादल
70 %
16 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!