🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल ८ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेचा मुद्देमाल चोरीस नेणाऱ्या संशयित आरोपीचा पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला. आरोपीला ताब्यात घेऊन चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी शिरीष सदाशिव संकपाळ (वय 31, सध्या रा. सहजिवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांच्या घरात ही घरफोडी झाली.
दि. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने घराच्या मागील दरवाजाला जोराने ढकलून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट उघडून लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला. चोरीची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तपासाला वेग दिला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली. संशयित आरोपी सचिन सदाशिव हासोळकर (वय 42, रा. प्लॉट नं. 16, सह्याद्री हौसिंग सोसायटी, कदमवाडी, कोल्हापूर) याचा शोध घेण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण ८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हस्तगत केलेल्यामुद्देमालामध्ये
सोन्याचे गंठण, सोन्याची चैन, अंगठ्या, सोन्याचा वाळा, कानातील टॉप्स, चांदीचे दागिने तसेच विविध दरांच्या भारतीय चलनी नोटांसह रोख रकमेचा समावेश आहे.
परिसरातील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे घरफोडीचा गुन्हा अवघ्या चार तासांत उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 606/2026, भारतीय न्याय संहिता कलम 305(A), 331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, म. पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संजय जाधव तसेच पोलीस अंमलदार सुशिल
कुमार गायकवाड, शुभम संकपाळ, महेश पाटील, प्रशांत आवळे, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, गौरव शिंदे, रविकुमार आंबेकर, सचिन पांगे आणि अमर सायेकर यांनी



